Type Here to Get Search Results !

बारामती ! भारतीय युवा पँथर संघटनेच्या साखळी उपोषणाला यश

बारामती ! भारतीय युवा पँथर संघटनेच्या साखळी उपोषणाला यश
बारामती : बारामती शहरातील पथ विक्रेते यांच्यावर कारवाई झाली होती.त्यानंतर प्रशासकीय भवन समोर भारतीय युवा पँथर संघटनेच्या माध्यमातून पथ विक्रेते यांच्यासमवेत साखळी उपोषण केले होते.उपोषण केल्यानंतर उपविभागीय अधिकारी बारामती व मुख्याधिकारी बारामती नगर परिषद यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर पथ विक्रेते यांना जागा देऊन व्यवस्थापन करून देऊ असे आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण स्थगित करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पथ विक्रेते यांचा उपजीविकेचा प्रश्न सोडविण्यासाठी दखल घेतली त्याबद्दल उपोषण कर्ते यांनी आभार व्यक्त केले.
पथ विक्रेते यांच्यासाठी भारतीय युवा पँथर संघटना उपोषण करीत असताना लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देखील भेट देऊन चर्चा केली होती.यावेळी महिला शहर अध्यक्षा आरतीताई गव्हाळे, अस्लम तांबोळी,अजिज सय्यद उपस्थित होते.

सदर उपोषण वेळी आम्हाला भेट देऊन पाठिंबा दिलेल्या सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी,पत्रकार,यांचे आभार यावेळी गौरव अहिवळे यांनी व्यक्त केले.भारतीय युवा पँथर संघटना अशाच पद्धतीने समाजातील सर्व घटकासाठी कायम लढत राहणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी यावेळी सांगितले.

भारतीय युवा पँथर संघटनेचे संपर्क प्रमुख शुभम गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा मंगलताई जाधव, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अलकाताई बनसोडे, सदस्य सीमाताई मुसळे,बारामती शहराध्यक्ष समीर खान,सदस्य अमोल पाथरकर यांनी सदर उपोषण यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test