बारामती - मएसोच्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ११वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. इयत्ता ९वीच्या विद्यार्थीनींनी योग प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या योग शिक्षिका निलिमा राजकुमार झारगड आणि सहकारी मंजुषा शिंगाडे, पल्लवी बनकर, प्रज्ञा माने, रेखा भागवत यांनी योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार, विविध आसने यांचे महत्त्व सांगितले. या वर्षी 'एक पृथ्वी, एक आरोग्य यासाठी योग ' अशी संकल्पना योग दिवसाकरिता ठरवली असल्याने विद्यार्थ्यांना आरोग्यासाठी योग दररोज करणे अत्यावश्यक आहे हे पटवून देण्यात आले.
प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम प्रकार, योग, प्राणायाम, आसने, सूर्यनमस्कार व ध्यानधारणा केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्श सुमित्रा सम्राट निकम यांनी केले. अशाप्रकारे अतिशय प्रसन्न वातावरणात व उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आली.
शाला समितीचे अध्यक्ष.अजय पुरोहित सर, शाळेचे महामात्र मा.डॉ.गोविंद कुलकर्णी सर आणि शाळेच्या तसेच मएसो नियामक मंडळ सदस्य राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य कुलकर्णी सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.