श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायवारी पालखी सोहळा २०२५,
श्री संत बाळूमामा श्री क्षेत्र आळंदी ते पंढरपूर पायीवारी, दत्तकृपा परब्रम्ह, गोपाळनाथ महाराज एकतारी भजनी मंडळ पिसुरती यांच्या वतीने दिंडी चालक ह.भ.प.आण्णा महाराज चोरमले आणि ह.भ.प. माणिक महाराज चोरमले यांच्या हस्ते बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी वकील ही पदवी संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी दिंडीतील सर्व वारकरी उपस्थित होते.
यावेळी दिंडीतील ह भ प माणिक पाटील चोरमले यांनी सुनील तात्या धिवार यांच्या बद्दल सांगितले की सुनील तात्या
धिवार हे एक असे व्यक्तिमत्व आहे की ते गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत. कायम बहुजन समाज कसा एकत्रित येईल आणि शिक्षित कसा होईल तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम कसे करता येईल यासाठीच त्यांचे बहुजन हक्क परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न चालू असतात. आज त्यांनी वयाच्या 51 व्या वर्षी विधीक्षेत्रातील वकील ही पदवी पास झाले त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचा अतिशय आनंद होत आहे. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन बारामती येथे अहिल्या विकास प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विश्वास नाना देवकाते यांनी आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला ही बाब निश्चितच आमच्यासारख्या सर्व बहुजन समाजाला अभिमानाची आहे. तात्यांचा सत्कार अजितदादांच्या हस्ते करण्यात आला ही बातमी मला पुण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यामध्ये समजली आणि मला असेल झाले की मी कधी सासवडला जाईल आणि आमच्या दिंडीच्या वतीने तात्यांचा सत्कार करेल असे झाले आणि आज आम्ही संत सोपान काका भूमीमध्ये आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये तात्यांचा सत्कार दिंडीच्या वतीने केला याचा आम्हाला खूप आनंद झाला.
सत्काराला उत्तर देताना बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील तात्या धिवार म्हणाले की मला मिळालेली वकिली पदवी मी गोरगरिबांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी त्याचा वापर करणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी वकिली करत असताना कोणत्याही गरीब माणसाचा एकही रुपया ती न घेता मी हे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या आईच्या प्रेरणेमुळे खऱ्या अर्थाने मीही पदवी घेतली परंतु आज माझी आई आनंद सोहळा पाहण्यासाठी नाही याची मला खंत आहे ही पदवी मी तिच्या चरणी अर्पण करतो. बहुजन हक्क परिषदेच्या माध्यमातून मला जेवढे समाजकार्य करणे शक्य होईल तेवढे समाजकार्य निश्चितच करेल असेही ते म्हणाले.