संत सोपानकाका पालखी सोहळा...बारामती तालुक्यातील पहिले अश्व रिंगण सोहळा उद्या गुरुवार रोजी काकडे महाविद्यालय येथे रंगणार.
मुख्य संपादक विनोद गोलांडे....
सोमेश्वरनगर - संत सोपानकाका पालखी सोहळा बुधवारी दि. २५ जून बारामती तालुक्यात प्रवेश करणार असून, गुरुवारी दि. २६ जून पालखीचा मुक्काम श्री सोमेश्वर साखर कारखाना येथे होणार आहे. तर सोमेश्वरनगर वाघळवाडी येथील मु. सा. काकडे महाविद्यालयात पालखी सोहळ्याचे पहिले अश्व रिंगण मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. रिंगणासाठी मैदानात सुसज्ज करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर सोमेश्वर कारखाना, महसूल व पोलिस प्रशासन, ग्रामपंचायती, आरोग्य विभाग, महावितरण आणि ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या वतीने संत सोपानकाका पालखीसाठी शिवाजी महाराज पुतळ्यामागील प्रांगणात सोमेश्वर कारखान्याच्या वतीने मंडप उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
पुरंदर तालुक्यातील मांडकी येथील मुक्कामानंतर पालखी निरामार्गे निंबुत येथे येणार असून, त्यानंतर निंबुत छपरी, वाघळवाडीमार्गे काकडे महाविद्यालयात आगमन होणार आहे. येथेच पहिले अश्व रिंगण उत्साहात पार पडणार असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळते. तसेच सोमेश्वर नगर करंजी फुल येथून सोमेश्वर कारखाना येथे पालखी मुक्कामाला येत असते.
या कामी सोमेश्वरनगर परिसरात साफसफाई, स्वच्छ पाणी व दुपारच्या भोजनाची सोय, तर निंबुत ग्रामपंचायतीने स्वागत व भोजन व्यवस्था केली आहे. निरा-बारामती रस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. संपूर्ण सोमेश्वरनगर परिसरात ग्रामपंचायतींनी चहा, नाष्टा, भोजनाची जय्यत तयारी केली असून, वारकऱ्यांचे स्वागत टाळ मृदंगाच्या गजरात व मनोभावे त्यांचे स्वागत सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिक करत असतात.