वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे दीपक वारुळे यांची पोलीस उपनिरीक्षक(PSI )पदी निवड
सोमेश्वरनगर प्रतिनिधी- बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी दीपक शिवाजी वारुळे यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली या अगोदर त्यांनी कार्यकाळ मधील वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध गुन्ह्यांचा छडा लावला होता तसेच करंजेपूल दूरक्षेत्र चे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल वडगाव निंबाळकर तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतून पोलीस प्रशासन तसेच विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.