अनावश्यक खर्च टाळत महाराष्ट्र न्यूज 11 या चैनल चा द्वितीय वर्धापन दिन वाणेवाडी येथील विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ येथे संपन्न झाला.वर्धापन दिनाच्या औचित्य साधत परिसरातील गरजू पाच कुटुंबियांना जीवनावश्यक किराणा वस्तूंचे किट महाराष्ट्र न्यूज 11 मार्फत उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी वाणेवाडी लोकनियुक्त सरपंच गीतांजलीताई जगताप, माजी सरपंच दिग्विजय जगताप, बारामती खरेदी विक्री संघ माजी चेअरमन विक्रम भोसले, तंटामुक्ती अध्यक्ष तुषार शिंदे, भाजप युवा मोर्चा प्रमुख इंद्रजीत भोसले, कृष्णाई पतसंस्था चेअरमन सुनील भोसले, सामाजिक कार्यकर्ते किशोर शेळके, भारतीय पत्रकार संघ पत्रकार बंधू सह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित सर्वच मान्यवरांचे आभार महाराष्ट्र न्यूज 11 चे संपादक मोहम्मद शेख यांनी मानले.