सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी. सोमवार दिनांक १४/७/२०२५ रोजी सकाळी ठीक ११ ते ५ या वेळेत येमुदत टाळनाद, जागरण गोंधळ, संबळ वादन, भजन, ढोल ताशा, धरणे आंदोलन या पैकी रोज एक प्रकारचे आंदोलन करणेबाबत.
अवैद्य धंद्यासह आपणास दिनांक २८/१/२०२५ रोजी दिलेला तक्रारी अर्ज दिनांक १०/२/२०२५ रोजी सासवड पोलीस स्टेशन समोर या बाबत केलेले टाळनाद आंदोलन. दिनांक २१/४/२०२५ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग, सासवड यांच्या कार्यालया समोर केलेले बेमुदत उपोषण. या विषयासह निवेदनात नमूद केलेल्या विषयाबाबत आपणास कारणे विनंती करण्यात येते की सासवड व जेजूरी पोलीस स्टेशन हद्दीत भर लोक वस्तीत हॉटेल ढाब्यावर बेकायदेशीर मद्य विर्की लोक वस्ती मध्ये बेकायदेशीरपणे हातभट्टी दारू विक्री , गांजा विक्री, मटका, जुगार, ऑनलाइन मटका, जुगार ऑनल EPUBLICAN BRIGAD चक्री यासह विविध प्रकारचे अवैद्य धंदे खुले आम सूरू आहेत. याबाबत वरील तारखेला आपणांससह संबधित पोलीस अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी अर्ज दिलेले आहेत. तसेच दिनांक १०/२/२०२५ रोजी सासवड पोलीस स्टेशन समोर जाहीर टाळनाद आंदोलन केलेले आहे. व दिनांक २१/४/२०२५ रोजी पविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग, सासवड यांच्या कार्यालया समोर केलेले बेमुदत उपोषण लेले आहे. अवैद्य धंदे बंद करणेबाबत सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग, सासवड यांची समक्ष भेट घेवून पोलीस स्टेशन हद्दीत अवैद्य धंदे "करणार्याची नावे व माहीती प्रत्येक्ष व दोघांच्याही मोबाइल whatsapp नंबर वर व्यक्तीशः पाठिवले आहेत तसेच तत्कालीन पुणे जि. ग्रामीण पोलीस अधिक्षक साहेब यांनी अवैद्य धंद्याबाबत तक्रार करण्याकरीता दिलेल्या मोबाइल नंबरवर तक्रार नोंदवून देखील अवैद्य धंदे करणारावर कारवाई करण्यात आली नाही. अवैद्य धंदे करणारा बरोबर हीत संबंध ठेवल्याचे कारण देवुन सासवड पोलीस स्टेशनचे दोन पोलिस कर्मचारी निलंबीत करण्यात आलेले आहेत. असे निवेदनात आहे तसेच
सासवड यांच्या कार्यालासमोर आंदोलन करण्यात आले त्या दिवशी आंदोलन कर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्या मधे झालेल्या चर्चे नुसार पंधरा दिवसामध्ये सर्व प्रकारची अवैद्य धंदे बंद करण्यात येतील असे लेखी आश्वासन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांनी दिले होते परंतु आज तागायत अवैद्य धंदे बंद करण्यात आले नाहीत. त्यांच्या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेले अवैद्य धंदे देखिल बंद होत नाहीत.
अवैद्य धंदयामुळे तरूण पिढी व्यसनाधीन होत असून तरूण पिढीचा कल अवैद्य धंदयाकडे दिसत आहे. अवैद्य धंदयातुन पैसा व पैशातून नेतेगिरी व भाईगिरी यांमुळे पुरंदर तालूक्याचे वातावरण गढूळ होवून तालूक्यात गुंडगिरी वाढत आहेत. भरलोक वस्तीत खूले आम अवैद्य धंदे सूरू असल्याने तालूक्यातील सर्व सामान्य नागरीक त्रस्त झाला आहे. सासवड शहरामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. परंतु ते असून नसल्यासारखे आहे. त्यामूळे सासवड व जेजूरी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व प्रकारचे अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत. या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले). श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने सोमवार दिनांक १४/७/२०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब भोर विभाग सासवड यांच्या कार्यालय समोर बेमुदत प्रती दिन ११ ते ५ या वेळेत बेमूदत टाळनाद, जागरण गोंधळ, संबळ वादन, भजन, ढोल ताशा व धरणे आंदोलन या पैंकी रोज एक प्रकारचे आंदोलन करण्यात येईल तरी योग्य ती कारवाई करण्यात यावी. ही नम्र विनंती हाय असे पत्र म्हटले आहे.