Type Here to Get Search Results !

बारामती ! पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अतिंम मुदत ३१ जुलैपर्यंत

बारामती ! पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अतिंम मुदत ३१ जुलैपर्यंत
बारामती : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन तालुका कृषी अधिकरी सचिन हाके यांनी केले आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 आहे.

तालुक्यात आतापर्यंत सरासरी 114% खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. त्याअनुशंगाने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. बारामती तालुक्यात पीक विमा योजना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. खरीप हंगामामील बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तूर, मका,कांदा या अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेतलेले सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात.

योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई- पीक पाहणी बंधनकारक आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक, 7-12 उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज भरुन सहभागी व्हावे. याशिवाय सामान्य सुविधा केंद्र (सीएससी), आपले सरकार सुविधा केंद्र येथे किंवा https://pmfby.gov.in या पोर्टलवरुनही अर्ज भरता येईल. पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषीरक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक 14447 यावर संपर्क करावा. अथवा संबंधित विमा कंपनी, बारामती तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test