श्रावण महिन्यातील उद्या पहिला श्रावणी सोमवारसाठी देवस्थान सज्ज.
विविध जिल्ह्यातील शिवभक्त घेतात "श्री सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग"दर्शन
सोमेश्वरनगर - पुणे पासून ८० किलोमीटर, सातारा १०० किलोमीटर तर बारामती पासून ३२ किलोमीटर अंतरावर असणारे करंजे येथील प्रसिद्ध श्री सोमेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील प्रति सोरटी सोमनाथाचे प्रतिरूप मानले जाणारे बारामती तील करंजे येथील श्री सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग आहे . श्रावण महिना महाशिवरात्र येथे दर्शनासाठी राज्यातून विविध जिल्ह्यातून शिवभक्त भाविक येत असतात श्रावण महिना शुक्रवार दि २५ पासून सुरू झाला असून उद्या २८ रोजी श्रावण पहिला सोमवार असल्याने भाविकांनी गर्दी पाहायला मिळात आहे. सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसरात मिठाई वाले,विविध प्रकारची दुकाने, हॉटेल, गृहऊपयोगी वस्तू तसेच लहान मुलांनसाठी विविध प्रकारचे पाळणे असल्याने परिसर गजबजून गेलेला आहे.उद्या पहिला सोमवार निमित देवस्थान ट्रस्ट ने येणाऱ्या शिवभक्त भाविकांसाठी दर्शन व्यवस्था , पिण्याचे शुद्ध पाणी, वाहनासाठी प्रशस्त पार्किंग, आरोग्य विभाग होळ च्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडगांव पोलिस स्टेशन माध्यमातून चोख पोलिस बंदोबस्त तसेच सोमेश्वरनगर विभाग महावितरण चे कर्मचारी असल्याचे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंत मोकाशी व सचिव विपुल भांडवलकर यांनी बोलताना माहिती दिली.