बारामती प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील कठीण पूल राठोड कोऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी श्री संत बाळूमामा यांच्या मेंढी माऊलीची समाधी आहे या समाधीवर दर्शन घेण्यासाठी व्यक्तीने माने लोक येत असतात या आषाढी एकादशी चे औचित्य साधून या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल रुक्मिणी व तुकाराम महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्यांचे पूजन करण्यात आले आणि सकाळी सात ते दहा या वेळेत अमोल बाळकृष्ण खलाटे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर दुपारची आरती बालयोगी बालब्रह्मचारी ह.भ.प बाळकृष्ण कोकरे महाराज यांच्या हस्तेआरती करण्यात आली.
त्यानंतर आलेल्या भाविकांसाठी फराळाची ही सोय करण्यात आली होती त्यानंतर दुपारी दोन ते चार या वेळेमध्ये हरिभक्त पारायण महेंद्र महाराज पिंगळे (बाळूमामा कथाकार) यांचे सुश्राव्य किर्तन झाले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमामुळे ज्या भाविकांना पंढरपूरला जाता आले नाही त्यांनी या ठिकाणी येऊन समाधान व्यक्त केले.