विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थिनीची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज सी.बी.एस.ई वाघळवाडी येथील इयत्ता ९ वी तील विद्यार्थिनी ईश्वरी प्रमोद निगडे हिची १७ वर्षीय ४४ किलो वजन गटातून जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली.
दिनांक १९ सप्टेंबर रोजी डीएसओ तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये ईश्वरीने आपल्या वजन गटातून सहभागी १० विद्यार्थी मधून प्रथम क्रमांक मिळवत ही कामगिरी केली.
तसेच ज्ञानेश्वरी सचिन जगताप हिने या स्पर्धेत १७ वर्षे ४२ किलो वजन गटातून द्वितीय क्रमांक मिळवला.
शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. सदर मुलींना शाळेतील क्रीडाशिक्षक उर्मिला मचाले व रणजित देशमुख यांनी मार्गदर्शन केले.