जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न..
बारामती - बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे सन २०१० च्या बॅच चा इयत्ता दहावीचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्यासाठी तत्कालीन शिक्षक व विद्यमान रयत शिक्षण संस्थेचे महासचिव पवार बी एन, मलगुंडे सर, सातपुते सर, निंबाळकर सर, तावरे सर, भिसे सर, गाढवे सर, मुंडे सर ,जगदाळे सर, जाधव मॅडम, शिंदे सर, व त्यावेळेसचे सन २०१० च्या बॅच चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम दरम्यान सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वतीने शिक्षकांचा आदरपूर्वक शाल-नारळ देऊन सन्मान करण्यात आला. तर अनेकांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व माजी विद्यार्थी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता दहावी अ मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये सध्या विविध पदावर कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा पार पडला. यामध्ये प्रतीक्षा घनश्याम जगताप यांची महाराष्ट्र राज्य एसआयटी मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. ओंकार इंगोले यांचा ऍडव्होकेट म्हणून सत्कार करण्यात आला.अमोल साळुंखे चार्टर्ड अकाउंट झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला..