"हर हर महादेव" च्या गजरात शिवभक्तांनी घेतले सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग दर्शन
श्रावणी दुसऱ्या सोमवारी शिवभक्त भाविकांचे सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग दर्शनासाठी गर्दी
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथाचे प्रति रूप मानले जाणारे करंजे येथील श्री सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग आहे श्रावण महिन्यात दरवर्षीच विविध जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून शिवभक्त भाविक स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी श्रावण महिन्यात येत असतात श्रावणी महिन्याचा दुसरा सोमवार (दि ४) रोजी हजारोंच्या संख्येने शिवभक्त स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेतले .
मिठाईवाले हॉटेल व्यवसायिक ,गृह उपयोगी वस्तू ,खेळणी असे स्टॉल लागलेले आहेत. श्रावणी पहिला सोमवार निमित्त पहाटे पासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती स्वयंभू शिवलिंग महापूजा श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना चेअरमन पुरुषोत्तम जगताप सपत्नी व प्रगतशील उद्योजक संतोष कोंढाळकर सपत्नी यांच्या हस्ते पार पडली
यावेळी पुणे जिल्हा पिडीसी बँक संचालक संभाजी होळकर , शेतकरी कृती समिती अध्यक्ष सतीशराव काकडे, करंजे सरपंच भाऊसो हुंबरे,करंजेपुल माजी सरपंच वैभव गायकवाड, देवस्थान चेअरमन अनंत मोकाशी, सचिव विपुल भांडवलकर सह विश्वस्त मान्यवरांच्या ग्रामस्थ उपस्थित
आलेल्या शिवभक्तांसाठी सकाळचे खिचडी अन्नदान स्वप्निल निकम, संगीता दामोदर खोमणे ,पुष्पा प्रताप खोमणे तसेच सायंकाळचा महाप्रसाद एक शिवभक्त करंजेपूल तर शिवलिंग गाभारा मंदिर सजावट उद्योजक दीपक साखरे व उद्योजक आर एन बापू शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली
देवस्थान ट्रस्टमार्फत भाविकांसाठी दर्शन व्यवस्था , पिण्याचे शुद्ध पाणी, वाहनासाठी प्रशस्त पार्किंग, आरोग्य विभाग होळ च्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडगांव पोलिस स्टेशन माध्यमातून चोख पोलिस बंदोबस्त तसेच सोमेश्वरनगर विभाग महावितरण चे कर्मचारी असल्याचे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंत मोकाशी व सचिव विपुल भांडवलकर यांनी बोलताना माहिती दिली.
श्रावण महिन्यातील पुढील दोन सोमवार असल्याने शिवभक्तांनी श्री क्षेत्र सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग दर्शनाचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन देवस्थान.
देवस्थान चेअरमन अनंत मोकाशी