सोमेश्वर पंचक्रोशीतील मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणाचा विजयीउत्सव ढोल ताशा आणि गुलालांची उधळण करत केला साजरा.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मुख्य चौक करंजेपूल येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या यशस्वी समारोपानंतर गावागावात गुलाल, फटाके, डिजे आणि पेढ्यांनी मराठा आरक्षणाचा विजयीउत्सव साजरा करण्यात आला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुबंईतील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसापासुन सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अखेर मंगळवारी (ता.२) रोजी सांयकाळी सर्वात मोठे यश मिळाल्याने बारामती तालुक्यातील गावा-गावात गुलाल उधळुन, फटाके फोडुन, एकमेकांना लांडु, पेढे भरवत, ढोल, ताशे वाजवत मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणाचा विजयीउत्सव मोठ्या जल्लोष साजरा केला.
_____________
मुबंईतील आझाद मैदानावर गेल्या पाच दिवसापासुन सुरु होते सोमेश्वर पंचक्रोशीतील मराठा समाज बांधव व करंजेपूल ग्रामस्थ यांच्यावतीने बांधवांसाठी रसद पाठवण्यात आली तसेच आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच मंगळवार (ता २)मिळालेल्या यशाचे सर्वांचे वतीने स्वागत अभिनंदन
करंजेपुल माजी सरपंच वैभव गायकवाड.
________________
सोमेश्वरनगर पंचक्रोशीतील सर्व मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या कायम सोबत राहणार व आरक्षण मिळून दिल्याबद्दल वाघळवाडी सोमेश्वरनगर नागरिकांच्या वतीने मी आपला ऋणी आहे.
वाघळवाडी उपसरपंच तुषार सकुंडे.



