सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कामगार भरतीत शासकीय नियमानुसार, अनुशेष न भरल्याचा आरोप करत विविध मागण्यांसाठी करंजे येथील ग्रामस्थ आणि ऊस उत्पादक सभासदांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.या उपोषणात करंजेचे सरपंच भाऊसाहेब हुंबरे, माजी उपसरपंच बुवासाहेब हुंबरे, संताजी गायकवाड, माउली केंजळे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटोळे, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शिंदे, अॅड. बाळासाहेब गायकवाड, प्रताप गायकवाड, सुनील मोकाशी, नंदकुमार मोकाशी, अनिल हुंबरे, माजी उपप्राचार्य एस.एस. गायकवाड, विक्रम दुर्वे, भाऊ गोरे, प्रकाश हुंबरे, प्रशांत जाधव, प्रसाद सोनवणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले.
उपोषणकर्त्यांनी सोमेश्वर कारखान्यातील कामगार भरतीत शासकीय नियमानुसार, अनुशेष न भरल्याचा आरोप केला. यामुळे परिसरातील अनेक कुटुंब रोजगारापासून वंचित राहिल्याचे त्यांनी सांगितले. करंजे गावातील युवकांना कारखान्यात नोकरी न देण्याचा आणि काही घरांतील अनेक व्यक्तींना नोकरीवर ठेवण्याचा भेदभाव केल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला.
याशिवाय, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाकडून करंजे भागशाळेला सातत्याने शैक्षणिक दृष्ट्या चांगले शिक्षक न देणे तक्रार केली तरी त्याची अंमलबजावणी न करत जाणून-बुजून अशी वागणूक मिळत असल्याचा आरोप करण्यात आला.
उपोषणाला पाठिंबा....
या उपोषणाला शेतकरी कृती समिती अध्यक्ष सतीशराव काकडे,करंजेपूलचे माजी सरपंच वैभव गायकवाड, मुरुमचे उपसरपंच सोमनाथ सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर, सुरेश यादव सह अनेकांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शविला.
करंजेचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब हुंबरे यांच्यासोबत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान संचालक आनंदराव होळकर यांनी करंजे गावाबद्दल अवमानकारक शब्द वापरला असल्याने त्यांनी माफी मागावी उपोषणकर्त्यांनी केलाव निषेध व्यक्त केला, तसेच याबाबत उपोषणकर्त्यांनी जाहीर कारखाना प्रशासनाने आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप करत, सरपंच भाऊसाहेब हुंबरे यांनी प्रशासनाविरोधात अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची घोषणा केली.
करंजे लोकनियुक्त सरपंच भाऊसो हुंबरे
__________________________
२०१४ मध्ये ४७२ विद्यार्थ्यांचा पट असलेली ही शाळा २०२५ मध्ये २२० विद्यार्थ्यांवर आली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा दावा करत, समर्पित शिक्षकांची नियुक्ती करावी
माजी उपप्राचार्य एस.एस. गायकवाड
__________________________
सोमेश्वर कारखाना प्रशासनाने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यांतर्गत करंजेपूल दुरक्षेत्र पोलिसांमार्फत पत्र देऊन उपोषणकर्ते भाऊसाहेब हुंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मागण्यांवर संचालक मंडळाच्या सभेत चर्चा करण्याचे आश्वासन दिले असले तरी उपोषणस्थळाकडे कारखाना संचालक मंडळ आणि प्रशासनाने जाणून-बुजूनच लक्ष न दिल्याने उपोषणकर्त्यांनी संताप व्यक्त करत निषेध केला. पुढील काळात याचे उत्तर देणार
ॲड. बाळासाहेब गायकवाड
___________________________
दिलेल्या पत्रविषयी....
शांततामयरित्या व लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आजच्या करंजे गाव आणि सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिक आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण मोडीत काढण्यासाठी संचालक मंडळाने केला. सत्तेचा दुरुपयोग करून हे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि संचालक मंडळ लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतेय का? हे पत्र त्यातील उद्देश आणी हेतू नक्की काय सांगतोय.?
या उपोषणामध्ये सर्व जाती धर्मातील लोक असूनही संचालक मंडळाने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केलेले आहे. याचा परिणाम भविष्यकाळा मध्ये नक्कीच या जातीवादी संचालक मंडळाला आणि एमडी यांना भोगावे लागणार आहे.
माजी उपसरपंच बुवासाहेब हुंबरे