बारामतीतील शिव कैलास धाम रुद्रभूमीमध्ये प्रलंबीत कामे पूर्ण विविध सुखसोयीदेखील नगरपरिषदेमार्फत करण्यात येणार... पाठपुराव्याला यश.
मुख्य संपादक विनोद गोलांडे
बारामती - बारामतीमधील वीरशैव लिंगायत समाजाच्या शिवकैलास धाम-रुद्रभुमी पाटस रोड येथे गेले अनेक महिने बोअरिंगला पाणी येत नव्हते, पाण्याच्या टाकीतील गळतीमुळे पाणी साठवता येत नव्हते. यामुळे अनेकांना अंत्यविधीसाठी गैरसोय होत होती. बरेच दिवस हा प्रश्न प्रलंबीत होता. बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय अॅड. सुभाषअप्पा ढोले हे बारामती नगरपरिषदेकडे सतत याकामी पाठपूरवठा करत होते. अप्पांच्या या प्रयत्नांना यश येऊन आज बुधवार दिनांक ३/९/२०२५ रोजी सायंकाळी बोअर खोदण्याचे काम सुरू करण्यात आले. सदर बोअरिंगमशीनची पूजा करण्यात आली यावेळी सुभाषअप्पा ढोले, नगर परिषदेचे अधिकारी , अतुल बनकर, सदर कामाचे ठेकेदार अक्षय बनकर व सामाजिक कार्यकर्ते अनंत पानसरे हे उपस्थित होते.
आपल्या शिव कैलास धाम रुद्रभूमीमध्ये नवीन बोअर घेणे, जुनी पाण्याची टाकी दुरुस्त करणे, नवीन टाकी बसवणे, पाईपलाईन करणे अशा सोयीदेखील नगरपरिषदेमार्फत केल्या जाणार आहेत. या कामामुळे समाजबांधवांना अंत्यविधी करणे सोईस्कर होणार आहे.तरी सर्व समाज बांधवांच्यावतीने अतुल बनकर, अक्षय बनकर, अनंत पानसरे व समाजाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व अॅड. सुभाषअप्पा ढोले यांचे आभार मानले.