सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवक सुखदेवराव शिंदे यांचा वाढदिवस साजरा.
सोमेश्वरनगर - सोमेश्वर पंचक्रोशीतील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेवराव शिंदे त्यांची ओळख आहे त्यांचा वाढदिवस एक जानेवारी रोजी व वाढदिवसाचे औचित्य साधत दरवर्षीच ते सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस साजरे करत असतात या वर्षी त्यांनी बारामती तालुक्यातील करंजे, माळवाङी, जोशीवाङी, चौधरवाङी,मगरवाङी, देऊळवाङी, नाईकवाङी, चोपनवस्ती, वाकी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळेतील मुलांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप करत वाढदिवस साजरा केला.सुखदेवराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसो व खासदार सुनेत्रावहिनी पवार यांचा कव्हर फोटो आसलेल्या वह्यांचे मित्रपरिवार यांच्या वतीने वाटप करण्यात येते.यावेळी शाळेतील मुलांच्या चेहर्यावरील आनंद व्दिगुणित झाला होता.लहान लहान चिमुकल्यांनी सुखदेवराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.अतिशय सुंदर आसा उपक्रम सुखदेवराव शिंदे मित्रपरिवार फ्लेक्स बाजी व इतर खर्च टाळून राबवित आसतात.
यावेळी निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब शिंदे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष ताराचंद शेंडकर, करंजे सरपंच भाऊसाहेब हूंबरे, तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटोळे, सदस्य विष्णू दगडे, मगरवाङी सरपंच विनिता हगवणे, वाकी सरपंच किसन बोङरे, चौधरवाडी गावचे मा. सरपंच संदीप चौधरी,उपसरपंच राहुल चौधरी , सोसायटी माजी चेअरमन रोहिदास चौधरी,अनिल भंङलकर,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंङकर,अनिल हूंबरे, प्रताप गायकवाड ,बंटी गायकवाड, नंदू मोकाशी ,माऊली केंजळे, वाकी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष जगताप, शिवराम जगताप,चौधरवाङी गावचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत पापळ,सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट मा चेअरमन राजेंद्र भांङवलकर,संतोष भांङवलकर,पांडूरंग हूंबरे, देऊळवाडी पोलीस पाटील प्रवीण शिंदे ,पत्रकार विनोद गोलांङे,व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



