राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची निवड झाल्याबद्दल सत्कार.
सोमेश्वरनगर - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची निवड झाल्याबद्दल सोमवार दि १२ रोजी सोमेश्वर परिसरातील आजी-माजी सैनिक संघटना सोमेश्वरनगर वतीने संस्थापक अध्यक्ष व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष ताराचंद शेंडकर व उपस्थित मान्यवर सदस्य यांनी सत्कार केला सूत्रसंचालन तक्रार निवारण कमिटी अध्यक्ष ॲड गणेश आळंदीकर यांनी केले तर करंजे ग्रामपंचायत कार्यालय येथे सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मान्यवर ग्रामस्थ वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच भाऊसो हुंबरे यांनी सत्कार तर ग्रामस्थांच्या वतीने तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटोळे यांनी शुभेच्छा दिल्या श्री सोमेश्वर मंदिर येथे श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था अध्यक्ष सुखदेव शिंदे यांच्या वतीने शालपुष्पहार श्रीफळ देत सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष संदीप बांदल , युवा अध्यक्ष ज्ञानेश्वर यांचाही सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्वच आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ , महिला व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



