बारामती प्रतिनिधी - श्री संत सदगुरू बाळूमामांच्या बग्गा नंबर १४ चे आगमन तांदुळवाडी येथील श्री भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात झाले होते. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या श्री संत सदगुरू बाळूमामांच्या पालखी सोहळ्याचा उत्साह मोठ्या थाटामाटात आज संपन्न झाला. यादरम्यान दररोज सायंकाळी विविध हरिभक्त परायण यांची कीर्तन सेवा घडत होती. यावेळी तांदुळवाडी आणि परिसरातील विविध सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि भाविक भक्तांनी स्वखुशीने अन्नदान उपक्रम राबवला. श्री संत सदगुरू बाळूमामांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भावीक येथे जमत होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने तांदूळवाडी गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सात दिवसापासून सुरू असलेला या सोहळ्याला जत्रेचे स्वरूप आले होते. भंडाऱ्याची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी, आणि डिजे च्या दणक्यामध्ये जळगावच्या दिशेने पालखी मार्गस्थ झाली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मा. नगरसेवक समीर पप्पू चव्हाण, राहुल भाऊ मदने, सनी देवकाते पाटिल, मेडद सरपंच गणेश काशीद, वस्ताद अमित शेट मालुसरे, जितुभाऊ पिसाळ, धीरज शेट बाबर, सोमा शेट बेलदार, मनोज बेलदार, अभि शेळके, सचिन भाऊ कदम, संदीप शेट व्हरगर, पप्पू बेलदार पाटिल, राजाभाऊ जाधव, रोहित शेट जाधव, समीर नाना चांदगुडे, किरण आण्णा पिसाळ व समस्त ग्रामस्थ तांदुळवाडीकर आणि कारभारी :श्री हाल्लापा सिद्धापा सुरणवर, पालखी क्रमांक १४ सर्व मेंढके बंधू व भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट तांदुळवाडी यांनी मोलाचे सहकार्य केले.



