Type Here to Get Search Results !

'सोमेश्वर'येथे माजी सैनिकांकडून सामाजिक उपक्रम राबवत प्रजासत्ताक दिन साजरा.

'सोमेश्वर'येथे माजी सैनिकांकडून सामाजिक उपक्रम राबवत प्रजासत्ताक दिन साजरा.
सोमेश्वरनगर - वीर नारींचा सत्कार,परिसरातील गुणवंतांचा सत्कार, मोफत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर ई कार्यक्रमाचे आयोजन करीत काल २६ जानेवारी २०२६ रोजी आमच्या बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटनेद्वारे प्रजासत्ताक दीन उत्साहात साजरा करणेत आला. आरोग्य शिबिरासाठी साई सेवा मल्टी स्पेशालिटी आय सी यू हॉस्पिटल चे डॉ विद्यानंद भिलारे, डॉ जयश्री भिलारे, डॉ राहुल शिंगटे, डॉ शुभम शहा ई.नी मोठे योगदान दिले. हिमोग्लोबीन,रक्तदाब याचबरोबर रक्तातील साखर तपासणी,गरजवंतांचे ई सी जी काढण्यापासून अनेक तपासण्या व उपचार यावेळी करणेत आल्या. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक राजवर्धन शिंदे यांनी ध्वजारोहण केले.पुरुषोत्तम जगताप यांनी आपल्या भाषणात आजी माजी सैनिक संघटनेचे कार्य आपण गेल्या सात वर्षापासून पाहत आहोत अतिशय प्रेरणादायी कार्य त्यांचे आहे.कोव्हीड सारख्या समाजावर आलेले संकट असो अथवा सांगली शिरोळ ला पूरग्रस्त संकट असो किंवा महाबळेश्वर जवळ दरडग्रस्त संकट असो सैनिक संघटनेने तिथे जात धान्य व गरजेचे साहित्य पोहोच केले आहे याचे साक्षीदार आपण आहोत असे म्हणून संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. या वेळी माजी सैनिक जगन्नाथ लकडे यांची पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी पदी निवड झालेबद्दल व विविध पदावर निवड झालेबद्दल अनेक आजी माजी सैनिकांचा सत्कार करणेत आला तसेच माजी सैनिक किरण सोरटे यांचा वाढदिवस असल्याने त्यांनीही रक्तदान करत आपला वाढदिवस संघटना ऑफिसमध्ये केल्याने त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
सूत्रसंचालन व प्रस्ताविक संघटनेचे तक्रार निवारण कमिटी अध्यक्ष ॲड.गणेश आळंदीकर यांनी केले.

या प्रसंगी अध्यक्ष ताराचंद शेंडकर,उपाध्यक्ष भगवान माळशिकारे,रामचंद्र शेलार, गणेश शेंडकर,लहू होळकर,बाळासाहेब गायकवाड,मोहन गायकवाड,राजाराम शेंडकर,राजेंद्र पवार,मीनानाथ होळकर,किरण सोरटे यांचेसह अनेक माजी सैनिक उपस्थित होते. सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी अध्यक्ष भाऊसो लकडे,राज्य सराफ सुवर्णकार समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष किरण आळंदीकर, सोमेश्वर कारखाना उपाध्यक्ष मिलिंद कांबळे,उद्योजक दीपक साखरे,पी एस आय राहुल साबळे,कुसुम बाळासाहेब शेंडकर,वीर नारी शीतल सूळ,शिवाजी शेंडकर सरपंच पूजा वैभव गायकवाड ,पत्रकार संतोष शेंडकर,युवराज खोमणे, विनोद गोलांडे सह इतर ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test