"नृत्य मल्हार" स्पर्धेत वाणेवाडी येथील स्वानंदी जाधव हिने मिळवला प्रथम क्रमांक
सोमेश्वरनगर - अण्णाभाऊ साठे रंग मंदिर येरवडा येथे मंगळवार दि २० जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या "नृत्य मल्हार" स्पर्धेत बारामती तालुक्यातील वाणेवाडी गावची सुकन्या स्वानंदी विक्रम जाधव , विद्या प्रतिष्ठान सोमेश्वरनगर हिने नृत्य स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक संपादन केला . त्यावेळी आरती कदम मॅडम यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले तसेच या कार्यक्रमाचे आयोजण बाळासाहेब नागवडे यांनी केले होते . या स्पर्धेत राज्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. लहान गटात २३४ स्पर्धक यामधून स्वानंदी ने प्रथम क्रमांक पटकावाला आहे.



