सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सी.बी.एस.ई वाघळवाडी येथे वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध वैयक्तिक तसेच सांघिक स्पर्धामध्ये बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.
मुलांचे भाषणकौशल्य, सभाधीटता, सृजनशीलता, या आणि अशा अनेक शैक्षणिक मूल्यांवर आधारित स्पर्धा असल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढलाच परंतु सांघिक सहकार्याची भावना दृढ झाली.
हा बक्षीसवितरणाचा कार्यक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागासाठी वेगवेगळ्या सत्रांमध्ये घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांबरोबर बक्षीसे स्वीकारल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला व शाळेतील पालक शिक्षक संघाच्या कार्यकारी मंडळातील सदस्यांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सचिन पाठक यांनी बक्षीसपात्र विद्यार्थी व पालकांचे कौतुक केले व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रम चे सूत्रसंचलन शितल पवार व ज्योती शिंदे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यामध्ये रेश्मा गावडे व बक्षीस वितरण विभागाचे बहुमूल्य योगदान दिले.



