Type Here to Get Search Results !

कंत्राटी कामगारांचे प्रश्न मार्गी करण्याचे नगराध्यक्ष सचिन सातव यांचे आश्वासन

कंत्राटी कामगारांचे प्रश्न मार्गी करण्याचे नगराध्यक्ष सचिन सातव यांचे आश्वासन 
बारामती :बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे यांनी बारामती नगरपरिषदेसमोर साखळी उपोषण सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, बानप नगरसेवक व जनशक्ती कंत्राटी कामगार संघ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. सदर उपोषणाची दखल घेऊन नगराध्यक्ष सचिन सातव यांनी लेखी पत्र देऊन कामगारांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन ठेकेदारांना सदर मागण्यांवर कारवाई करणेबाबत सूचना दिल्या आहेत.काही विभागाच्या ठेकेदारांनी तत्काळ सदर मागण्या मान्य देखील केल्या आहेत.
 कामगारांच्या मागण्यांबाबत योग्य ती दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सध्या सुरू असलेले साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याची भूमिका घेतली आहे. आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी आरोग्य विभागातील कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे यावेळी सांगितले. कामगारांच्या मागण्या पूर्ण होण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पुढील निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाईल,असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष श्वेता नाळे,आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ,गटनेते संजय संघवी,विरोधी पक्ष नेत्या आरती ताई शेंडगे (गव्हाळे), नगरसेवक राजेंद्र सोनवणे, अमर धुमाळ,अमोल कावळे,सोमनाथ गजाकस,विशाल हिंगणे उपस्थित होते.
 जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे,उपाध्यक्ष विजय मस्के, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे,सह संघटक ओम शिंदे,बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात,महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे,महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर,महिला संघटक अलका बगाडे , महिला सरचिटणीस अनिता पवार,महिला सह कार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे पदाधिकारी, सदस्य संतोष भट,स्वप्निल लोंढे राहुल सोनवणे,संतोष भट, कंत्राटी कामगार उपस्थित होते.
कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघ लढत राहणार असे कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test