Type Here to Get Search Results !

माळेगाव नगर पंचायत रोजंदारी कामगारांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघ लढणार

माळेगाव नगर पंचायत रोजंदारी कामगारांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघ लढणार
बारामती/माळेगाव : माळेगाव ग्रामपंचायती पासून रोजंदारीवर कामगार अनेक वर्ष काम करीत आहेत.माळेगाव नगरपंचायत झाल्यानंतर कामगारांना किमान वेतन,पी.एफ.,विमा ,शासन सेवेत कायम करणे, साप्ताहिक सुट्टी अशा मागण्या आहेत.
सदर मागण्याबाबत कामगारांनी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे याबाबत माहिती दिली व मदत मागितली त्यानंतर सदर कामगारांच्या मागण्या व प्रश्नासंदर्भात माळेगाव नगर पंचायत नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांची जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे,बारामती शहर कार्याध्यक्ष निखिल सरोदे व रोजंदारी मधील कामगार यांनी भेट घेतली.यावेळी नगराध्यक्ष यांनी सांगितले की आम्ही कामगारांचे प्रश्न मार्गी लावू.तसेच महाराष्ट्र शासन स्तरावर जे प्रश्न असतील त्यांचा पाठपुरावा करण्यात येईल.
जनशक्ती कंत्राटी कामगार संघ माळेगाव नगरपंचायतीमधील कामगारांना किमान वेतन व सेवेत कायम करणे व इतर मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा देणार आहे. असे यावेळी गौरव अहिवळे यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test