Type Here to Get Search Results !

बारामती वारकरी सेवा संघाने राबविलेले सामाजिक व धार्मिक उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी- राजाभाऊ चोपदार....बारामती तालुका वारकरी सेवा संघ कार्यकारिणी जाहीर.

बारामती वारकरी सेवा संघाने राबविलेले सामाजिक व धार्मिक उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी- राजाभाऊ चोपदार.


बारामती तालुका वारकरी सेवा संघ कार्यकारिणी जाहीर.

बारामती : महाराष्ट्रातील संतांनी समाजसुधारणेचे कार्य करताना जात-धर्म, उंच-नीच असा कोणताही भेदभाव केला नाही. आज मात्र त्यांना जातींच्या चौकटीत ठेवून काही मंडळी काम करीत आहेत.. संतानी समाजप्रबोधनासाठी केलेले निरपेक्ष कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यामुळेच त्यांच्या विचारांचा गौरव शेकडो वर्षे झाली तरी विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून अखंडपणे होत आहे. बारामती शहर व तालुका वारकरी सेवा संघाने राबविलेले सामाजिक व धार्मिक उपक्रमही समाजासाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहेत, असे मत वारकरी सेवा संघाचे राज्य संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ चोपदार यांनी व्यक्त केले.

मोरयानगर, मेडद (ता. बारामती) येथील वारकरी सदन येथे वारकरी सेवा संघाच्या बारामती शहर व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्यांच्या नियुक्तीपत्र प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चोपदार बोलत होते. कार्यक्रमास वारकरी सेवा संघाच्या राज्य सचिव अॅड. माधवी निगडे, पुणे जिल्हाध्यक्ष निवृत्ती कोळेकर, माजी जिल्हाध्यक्ष किशोर कामठे, बाळासाहेब बारवकर, संजय बोरगे, उपाध्यक्ष दत्तात्रय गावडे, मुळशी तालुकाध्यक्ष पांडुरंग दातीर, राजगड तालुकाध्यक्ष ईश्वर चोरघे यांच्यासह वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बारामती तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये जगन्नाथ जगताप (अध्यक्ष), दत्तात्रय भोसले (कार्याध्यक्ष), सतीश गावडे व मोहनराव भांडवलकर (उपाध्यक्ष), निखिल कदम (सचिव), अॅड. दिक्षाताई गाढवे (सहसचिव), सोमनाथ भिले (प्रसिद्धी प्रमुख), बबनराव तावरे (संघटक), प्रियाताई जगताप (सहसंघटक), गणेश शिंदे (संपर्क प्रमुख), वैष्णवी पवार (सहसंपर्क प्रमुख) व गोविंद चव्हाण (मार्गदर्शक) यांची निवड करण्यात आली. तसेच तालुक्यातील १८ जणांना सदस्य म्हणून नियुक्तीपत्रे देण्यात आली.

बारामती शहर कार्यकारिणीत श्रीकांत झोरे (शहराध्यक्ष), सचीन गवारे (कार्याध्यक्ष), नितीन चालक व ज्ञानेश्वर गावडे (उपाध्यक्ष), नानासो झांबरे (सचिव), प्रकाश कोळी (सहसचिव), संजय धुमाळ (खजिनदार), हणुमंत देवकाते (सहखजिनदार), राजेंद्र शिर्के (प्रसिद्धी प्रमुख), राजेंद्र सोळसकर (मार्गदर्शक), गणेश जोजारे (मार्गदर्शक), शत्रुघ्न घुले (संघटक), लहु तावरे (सहसंघटक), अजित खटके (कार्यवाहक) व सचिन शिंदे (संपर्क प्रमुख) यांची निवड करण्यात आली.

दरम्यान, या कार्यक्रमात वारकरी सेवा संघाच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी सतीश खराडे व सचिवपदी अंकुश बनसोडे यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. येत्या १५ दिवसांत इंदापूर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असल्याचे तालुकाध्यक्ष खराडे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब बारवकर यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय भोसले व गणेश जोजारे यांनी केले. नानासो झांबरे व जगन्नाथ जगताप यांनी आभार मानले. निखिल महाराज कदम यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test