Type Here to Get Search Results !

आरक्षित दफनभूमीची जागा लवकरच हस्तांतरीत करणार - नगरसेवक आलताफ सय्यद

आरक्षित दफनभूमीची जागा लवकरच हस्तांतरीत करणार - नगरसेवक आलताफ सय्यद
बारामतीः बारामती येथील मंजूर विकास आराखड्यातील आरक्षित दफनभूमी व स्मशानभूमीची जागा लवकरच नागरिकांच्या वापरासाठी हस्तांतरीत करण्याची प्रक्रीया नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक आलताफ सय्यद यांनी दिली. 
राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामती शहरातील मुस्लिम समाजाची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन मंजूर विकास आराखड्यात नगरपरिषदेच्या वाढीत हद्दीतील जळोची, तांदूळवाडी, रुई व बारामती ग्रामीण या भागात स्मशानभूमीसाठी आठ तर दफनभूमीसाठी सहा ठिकाणच्या जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. 
नुकत्याच नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक आलताफ सय्यद यांनी दफनभूमी आरक्षित जागेबाबत विषय घेतला होता. त्या विषयास नगराध्यक्ष सचिन सातव यांनी सूचना केल्यामुळे मुख्याधिकारी पंकज भुसे, आलताफ सय्यद, नगररचना कार्यालयाचे नगररचनाकार श्रीकांत गिते. प्रभारी नगररचनाकार विनोद कांबळे, सहाय्यक नगरचनाकार सुमित काशिद यांनी प्रत्येक्ष आरक्षित ठिकाणी स्थळपाहणी करून, संबंधित जागा मालकांना बाधित क्षेत्राचा आगाऊ ताबा नगरपरिषदेस देणेबाबत संमती दर्शक प्रस्ताव सादर करण्याबाबत व त्या मोबदल्यात एफएसआय/टीडीआर देण्यास तयार असल्याचे पत्र पाठविण्यात आले आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री ना.सुनेत्रावहिनी पवार यांचेकडे अल्पसंख्यांक विकास विभाग हे खाते असल्याने त्यांच्या सहकार्याने या आरक्षित जागेत संरक्षण भिंत व सुशोभिकरण करण्यास लागणाऱ्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात येईल असेही आलताफ सय्यद यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test