Type Here to Get Search Results !

काकडे महाविद्यालयात इयत्ता 11 वी ऑनलाइन प्रवेशास सुरुवात.....महाविद्यालयात मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व सुविधा केंद्र सुरू

काकडे महाविद्यालयात इयत्ता 11 वी ऑनलाइन प्रवेशास सुरुवात.
महाविद्यालयात मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व सुविधा केंद्र सुरू 
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेला ऑनलाइन पद्धतीने सुरुवात झाली आहे. 

प्रवेशाचे तपशील:
- अर्ज प्रक्रिया :  महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश पोर्टलद्वारे अर्ज भरता येतील
- शाखा उपलब्ध: कला, वाणिज्य आणि विज्ञान
- आवश्यक कागदपत्रे: इयत्ता 10 वी प्रवेशपत्र (हॉल तिकीट), मोबाईल नंबर, ईमेल आयडी
- अर्जाची अंतिम तारीख : 30 एप्रिल 2026 आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी सांगितले की, "विद्यार्थ्यांना  ऑनलाइन नोंदणी करता यावी म्हणून महाविद्यालयात मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व सुविधा केंद्र सुरू केले आहे तसेच इयत्ता दहावीचा निकाल लागल्यानंतर भाग दोन ही प्रक्रिया ही गुणवत्तेनुसार व आरक्षण नियमानुसार होईल अधिक माहितीसाठी महाविद्यालयास भेट द्यावी किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा."असे आवाहन उपप्राचार्य प्रा. राहुल गोलांदे यांनी केले

संपर्क: काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर तालुका बारामती जिल्हा पुणे.
संपर्क :-
9860164612
9850519850
9623663937

इच्छुक विद्यार्थी व पालकांनी प्रवेशाच्या तारखा व सूचना वेळोवेळी तपासाव्यात असे आवाहन मा. प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test