बारामती - आगामी दिनांक २३ एप्रिल रोजी होणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक खर्चावर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त खर्च निरीक्षक बनोत अखिल रामनाईक यांनी उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी आज पूर्ण केली. या पोटनिवडणुकीत एकूण २३ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, निवडणूक कालावधीत त्यांच्या खर्चाची एकूण तीन टप्प्यांत तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार पहिली तपासणी १३ एप्रिल रोजी पार पार पडली होती, तर दुसरी तपासणी १७ एप्रिल रोजी पूर्ण झाली आहे. तिसरी आणि अंतिम तपासणी २१ एप्रिल रोजी होणार असल्याने. आज रोजी झालेल्या तपासणीदरम्यान २३ पैकी २२ उमेदवारांनी आतापर्यंतचा दैनंदिन निवडणूक खर्चाचा अहवाल खर्च निरीक्षकांकडे सादर केला. सादर करण्यात आलेल्या खर्चाच्या नोंदींची सखोल पडताळणी करण्यात आली. यावेळी सहाय्यक खर्च निरीक्षक सुरेंद्र वाघमारे, संजय शेलार, खर्च पथक प्रमुख तुषार मोरे, व्हिडिओ व्हिजिलन्स टीम (ततढ) प्रमुख लोदडे तसेच खर्च पथकातील सदस्य अशोक शिरतोडे, स्वप्नील आपुणे, स्वाती दराडे, अक्षय मांडवे, प्राची सपकाळ आणि सागर जगताप उपस्थित होते.
बारामती ! बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण
April 18, 2026
0
बारामती ! बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण
Tags



