बारामती ! संत सावतमाळी इंग्लिश मीडियम स्कूलचा राष्ट्रीय स्तरावर गौरव.
बारामती - बारामतीतील डोर्लेवाडी येथील संत सावतमाळी इंग्लिश मीडियम स्कूल (पॉवर्ड बाय लीड) या विद्यालयाने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये लीड शिक्षा पुरस्कार प्राप्त करून राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. देशभरातील ५००० हून अधिक शाळांमधून स्पर्धा होत असताना, विद्यालयाने संपूर्ण भारतात द्वितीय क्रमांक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. ही कामगिरी शाळेत १००% नवीन शैक्षणिक धोरण आधारित अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे साध्य झाली आहे.
हा भव्य पुरस्कार सोहळा दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी हैदराबाद येथे पार पडला. या वेळी सुमित मेहता (फाउंडर ऑफ लीड ग्रुप) आणि लौकिक सर (नॅशनल अकॅडमी हेड) यांच्या हस्ते विद्यालयास हा सन्मान प्रदान करण्यात आला.
विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृतीतून शिक्षण, विविध उपक्रमाधारित शिक्षण, कम्प्युटर कोडिंग, तसेच आगामी वर्षात रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सर्जनशील विचारसरणी यांसारखे आधुनिक उपक्रम सुरू करण्यात येत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कौशल्यविकास आणि नवोन्मेषी दृष्टिकोन वाढीस लागला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अभिजीत निंबाळकर , सुमित्रा निंबाळकडी, प्राचार्य पृथ्वीराज नवले, जयश्री थोरात, सोनाली सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालक यांचे विशेष योगदान असून सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
विद्यालयाच्या या यशामुळे परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.



