Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर! सोमेश्वरनगर डिप्लोमातील १५६ जणांना कंपन्यांत संधी

सोमेश्वरनगर! सोमेश्वरनगर डिप्लोमातील १५६ जणांना कंपन्यांत संधी

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शरदचंद्र पवार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या डिप्लोमा महाविद्यालयाने यंदा प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश मिळविले. तब्बल १५६ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळाली.
यामध्ये टीई कनेक्टिव्हिटी इंडिया, ओम व्ही सॅव आयटी सोल्युशन, वाय एसएएएस इन्फोटेक, सोना अॅलॉइस, भारत गीअर्स, पियाजिओ,बजाज ऑटो या कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांच्या वतीने अधिकारी पांडुरंग डोके, विशाल कातुरे, गणेश जाधव, युवराज गडदरे, अक्षय रासकर आणि योगेश घावटे यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी समाधान व्यक्त केले तर उपाध्यक्ष मिलिंद कांवळे, ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, आनंदकुमार होळकर, सुनील भगत, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, ऋषिकेश गायकवाड, हरिभाऊ भोंडवे, अनंत तांबे, रणजित मोरे, किसन तांबे, जितेंद्र निगडे, तुषार माहुरकर, सचिव भारत खोमणे व सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्राचार्य सोमनाथ हजारे, अमरजीत घाडगे, विवेक भापकर, रोहिणी घारे, ज्योती खरात, तुषार गावडे, मोरेश्वर भोईटे, राहुल कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test