Type Here to Get Search Results !

फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाचा पदभार स्वीकारताच कामकाजाला वेग ; खामगाव येथील दीर्घकालीन पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष.

फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाचा पदभार स्वीकारताच कामकाजाला वेग ; खामगाव येथील दीर्घकालीन पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष.
फलटण - फलटण पंचायत समितीच्या सभापती चा पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाला वेग दिला असून “ॲक्टिव्ह मोड”मध्ये विविध प्रश्न हाताळण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर खामगाव येथील दीर्घकालीन पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. सभापती कु.शिवांजली विक्रमसिंह भोसले यांच्या आणि साखरवाडीचे माजी सरपंच विक्रम आप्पा भोसले यांच्या पुढाकाराने संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. लवकरात लवकर नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
याबाबत बोलताना सभापती म्हणाल्या की, “जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हीच माझी प्राथमिकता आहे. खामगावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या सहकार्याने ठोस पावले उचलत आहोत.”
स्थानिक नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून लवकरच प्रत्यक्ष परिणाम दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test