Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! प्रा.जाधव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

सोमेश्वरनगर !  प्रा.जाधव यांना पीएच.डी. पदवी प्रदान
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा. काकडे महाविद्यालयातील प्रा. जाधव पोपट यशवंत यांनी “समकालीन हिंदी उपन्यासों चित्रित मुंबई परिवेश” या विषयावर सादर केलेल्या शोध प्रबंधासाठी सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय पुणे द्वारा पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

या संशोधन कार्यासाठी त्यांना प्रो. डॉ. सदानंद भोसले (सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय पुणे, अध्यक्ष, हिंदी विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी महाविद्यालयीन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मा. सतीश काकडे-देशमुख, प्राचार्य, डॉ. देविदास वायदंडे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजित काकडे देशमुख, व्यवस्थापन समितीचे सचिव सतीश लकडे,सहकारी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test