Type Here to Get Search Results !

सोमेश्वर विद्यालयाचा निकाल ९८.३२ टक्के दहावीत पुन्हा मुलींची बाजी, प्रथम क्रमांकावर समीरा संतोष शेंडकर.गणित विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवत राज्यात बोर्डात द्वितीय क्रमांकाची मानकरी समीरा शेंडकर.

सोमेश्वर विद्यालयाचा निकाल ९८.३२ टक्के दहावीत पुन्हा मुलींची बाजी, प्रथम क्रमांकावर समीरा संतोष शेंडकर.
गणित विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवत राज्यात बोर्डात द्वितीय क्रमांकाची मानकरी समीरा शेंडकर.


सोमेश्वरनगर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून  यंदाच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे. बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सोमेश्वर विद्यालयाचा एस. एस .सी. परीक्षा मार्च २०२६ निकाल परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी २३८ पैकी २३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल ९८.३२ टक्के लागला आहे.विद्यालयातील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थी
 समिरा संतोष शेंडकर ४७७/५०० - ९५.४०% प्रथम क्रमांक, सिद्धी संजय अलगुडे ४७५/५०० - ९५.००% द्वितीय क्रमांक
, राजलक्ष्मी अशोक लकडे ४७०/५०० - ९४.००% तृतीय क्रमांक तसेच मुलींमध्ये प्रथम  समिरा संतोष शेंडकर - ४७७/५०० - ९५.४०% मिळवले असून मागासवर्गीय प्रथम क्रमांक राजलक्ष्मी अशोक लकडे ४७०/५००-१४.०० टक्के मिळवत पटकावला .

गणित विषयात १००  पैकी ९९ गुण मिळवून राज्यात बोर्डात द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल समीरा शेंडकर हिचे सोमेश्वर पंचक्रोशीतून कौतुक व अभिनंदन होत आहे.

  या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सचिव भारत खोमणे तसेच प्राचार्य प्रमोद जगताप सह  शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test