मुख्य संपादक विनोद गोलांडे
बारामती प्रतिनिधी - बारामतीतील म.ए.सो हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल बारामती.म.ए.सो च्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे इयत्ता १०वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ०८ मे २०२६ रोजी लागला या निकालामध्ये शाळेचा विद्यार्थी चि. प्रथमेश मनोज लोळगे या विद्यार्थ्याने ९१.४०% मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर कु. वीणा सचिन भागवत ९०.८०% मिळवत द्वितीय क्रमांक आणि चि. ऋग्वेद नागेश गटगिळे आणि कु. अफशीन हमीर पठाण या दोघांनीही ९०.००% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
शाळेची ही दहावीची तिसरी बॅच असून शाळेचा निकाल १००% लागल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली क्षीरसागर व सर्व शिक्षक वृदांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाला समितीचे अध्यक्ष .अजय पुरोहित सर, शाळेचे महामात्र मा.डॉ.गोविंद कुलकर्णी आणि शाळेच्या तसेच मएसो नियामक मंडळ सदस्य राजीव देशपांडे सर, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य पी.बी. कुलकर्णी सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सोनाली क्षीरसागर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



