ब्रह्मचैतन्य कार्यालय येथे शुक्रवारी समाधान शिबिर आयोजन; पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील ब्रह्मचैतन्य कार्यालय येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराद्वारे नागरिकांच्या महसूल व विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रश्नांचे तत्काळ निराकरण करण्यात येणार आहे. हे शिबिर शुक्रवार दि. १५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत निंबूत येथील ब्रह्मचैतन्य कार्यालय येथे पार पडणार आहे. करंजेपूल मंडळ - करंजे,देऊळवाडी ,चौधरवाडी ,करंजेपूल ,मगरवाडी ,सोरटेवाडी,वाघळवाडी ,वाणेवाडी ,मुरूम ,निंबूत,खंडोबाचीवाडी ,गडदरवाडी,वाकी ,चोपडज,कानाडवाडी ही गावे आहेत.
करंजेपूल मंडल अधिकारी व मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराचा लाभ पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



