Type Here to Get Search Results !

विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) – 100% निकाल जाहीर

विद्या प्रतिष्ठान सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE) – 100% निकाल जाहीर
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर  विद्या प्रतिष्ठानच्या Someshwar English Medium School, CBSE येथील इयत्ता 12 वी विज्ञान (AISSCE 2025–26) तसेच वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर झाला असून दोन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत 100% निकाल प्राप्त केला आहे.
विज्ञान शाखा (Science Stream):
या परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल 100% लागला आहे. शाळेतील टॉपर्समध्ये सार्थकी बाळासाहेब कापरे (91.00%) प्रथम क्रमांक, अथर्व अमोल वाडकर (85.60%) द्वितीय क्रमांक आणि वेदांती किरण चाबुकस्वार (73.20%) तृतीय क्रमांकावर आहेत.
विषयानुसार विशेष यश:
English: वेदांती किरण चाबुकस्वार – 88
Mathematics: सार्थकी बाळासाहेब कापरे – 82
Physics: सार्थकी बाळासाहेब कापरे – 78
Chemistry: सार्थकी बाळासाहेब कापरे – 92
Biology: अथर्व अमोल वाडकर – 81
Information Technology (IT): सार्थकी बाळासाहेब कापरे – 100
Agriculture: अथर्व अमोल वाडकर – 98
वाणिज्य शाखा (Commerce Stream):
इयत्ता 12 वी (वाणिज्य) मध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 100% निकाल लागला आहे. गुणवत्ता यादीत स्माइली पृथ्वीराज यादव (85.60%) प्रथम क्रमांक, उन्नती भावेश पटेल (84.00%) द्वितीय क्रमांक आणि अलिजा रिझवान पठाण (83.40%) तृतीय क्रमांकावर आहेत.
विषयानुसार विशेष यश:
English: स्माइली पृथ्वीराज यादव – 89
Economics: पृथ्वीराज धनसिंग गावडे – 80
Business Studies: स्माइली पृथ्वीराज यादव – 90
Accountancy: पृथ्वीराज धनसिंग गावडे – 58
Retail: स्माइली पृथ्वीराज यादव व उन्नती भावेश पटेल – 96
Agriculture: अलिजा रिझवान पठाण – 93
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test