फलटण प्रतिनिधी - फलटण पंचायत समिती च्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले या सभापती पदी विराजमान झाल्या पासून तालुक्यातील अनेक विकास कामांना वेग आला आहे
साखरवाडी गणातील अनेक रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झालेली असून नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत होता. शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कामानिमित्त ये-जा करणारे नागरिक तसेच आपत्कालीन सेवांसाठीही हे रस्ते अडचणीचे ठरत होते. नागरिकांकडून सतत येणाऱ्या तक्रारी आणि मागण्या लक्षात घेता संबंधित प्रश्न गांभीर्याने घेत मी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत रस्ते दुरुस्ती व नूतनीकरणाचा प्रस्ताव मांडला होता.
त्या पाठपुराव्याला यश येत असून संबंधित विभागाकडून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. साखरवाडी ते बडेखान मार्ग,साखरवाडी ते जिंती मार्ग, साखरवाडी ते फडतरवाडी , साखरवाडी ते मुरूम रस्ता तसेच इतर महत्त्वाच्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत लवकरच रस्त्यांची कामे सुरू होतील असा विश्वास फलटण पंचायत समिती सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी व्यक्त केला आहे.
________
सभापती म्हणून माझ्यावर नागरिकांनी ,पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण अशा प्रत्येक विषयावर लोकांना प्रत्यक्ष फायदा होईल अशा कामांना प्राधान्य देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे



