Type Here to Get Search Results !

सोमेश्वरनगर ! 'महाराजस्व' समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद....समाधान शिबिराचा १७७ लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

सोमेश्वरनगर ! 'महाराजस्व' समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

समाधान शिबिराचा १७७ लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
सोमेश्वरनगर -  बारामती तालुक्यातील ब्रह्मचैतन्य कार्यालय नींबूत येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल 'महाराजस्व' समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. करंजेपूल मंडल अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या १५ गावांतील नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेतला. त्यातील १७७ नागरिकांना शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून लाभमिळाला.

उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप , सोमेश्वर साखर कारखाना विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे,महसूल नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी,पोलिस पाटील, सरपंच, प्रशासक तसेच मंडल अधिकारी ,कोतवाल,उपस्थित होते. उपसरपंच अमर काकडे यांनी स्वागत तर मंडल अधिकारी प्रमिला लोखंडे यांनी प्रास्ताविक केले.
महसूल विभागामार्फत उत्पन्न,अधिवास, नॉन क्रिमी लेयर, अल्पभूधारक  प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. आधार कार्ड दुरुस्ती व अद्ययावत मोहिमेत लाभार्थ्यांची कामे करण्यात आली. जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत  शेतकऱ्यांना अद्ययावत सातबारा व ८-अ उतारे देण्यात आले. कृषी विभागामार्फत दोन लाभार्थ्यास ट्रॅक्टरचे वाटप केले. ग्रामपंचायत विभागाने जन्म-मृत्यू दाखले व घराचे उतारे उपलब्ध करून दिले. असे विविध १७७ दाखले लाभार्थ्यांना देण्यात आले.
सरपंच हेमंत गायकवाड, सोमेश्वर साखर कारखाना संचालक राजवर्धन शिंदे यांनी नागरिकांना असणाऱ्या विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले. मदन काकडे यांनी विशेष सहकार्य केले.
आयोजित कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर शेतकरी कृती समिती अध्यक्ष सतीश काकडे ,पुणे जिल्हा एसटी महामंडळ माजी विभाग प्रमुख रमाकांत गायकवाड, उद्योजक संतोष कोंढाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) रोहित वाकचौरे, अक्षय कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test