सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर विद्या प्रतिष्ठानच्या CBSE इंग्लिश मीडियम स्कूल चा इयत्ता १२ वी विज्ञान तसेच वाणिज्य शाखेचा निकाल जाहीर झाला असून दोन्ही शाखांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत १००टक्के निकाल प्राप्त केला आहे.
विज्ञान शाखा या परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेतील टॉपर्समध्ये सार्थकी बाळासाहेब कापरे प्रथम क्रमांक, अथर्व अमोल वाडकर द्वितीय क्रमांक आणि वेदांती किरण चाबुकस्वार तृतीय क्रमांकावर आहेत.
विषयानुसार विशेष यश: इंग्रजी वेदांती किरण चाबुकस्वार, मॅथेमॅटिक सार्थकी बाळासाहेब कापरे, फिजिक्स सार्थकी बाळासाहेब कापरे, केमिस्ट्री सार्थकी बाळासाहेब कापरे , बायलॉजी अथर्व अमोल वाडकर , इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटी सार्थकी बाळासाहेब कापरे, एग्रीकल्चर अथर्व अमोल वाडकर तसेच वाणिज्य शाखा इयत्ता १२ वी (वाणिज्य) मध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकाल लागला आहे. गुणवत्ता यादीत स्माइली पृथ्वीराज यादव प्रथम क्रमांक, उन्नती भावेश पटेल द्वितीय क्रमांक आणि अलिजा रिझवान पठाण तृतीय क्रमांकावर आहेत.
विषयानुसार विशेष यश : इंग्लिश स्माइली पृथ्वीराज यादव, इकॉनोमिक पृथ्वीराज धनसिंग गावडे , बिझनेस स्टडीज स्माइली पृथ्वीराज यादव, अकाउंटन्सी पृथ्वीराज धनसिंग गावडे, रिटेल स्माइली पृथ्वीराज यादव व उन्नती भावेश पटेल, एग्रीकल्चर अलिजा रिझवान पठाण विशेष गुण प्राप्त झाल्यामुळे उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षकवर्ग आणि पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



