पुणे - १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याकरीता ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, कार्यालय प्रमुख तसेच वाहन मालकांनी वाहनावर एचएसआरपी लावून घ्यावे, असे आवाहन बारामतीचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल गावडे यांनी दिली आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे व तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे अत्यावश्यक आहे. या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे महत्व लक्षात घेता वाहनांवर एचएसआरपी बसविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रातील वाहनांना एचएसआरपी बसविण्याकरीता M/s FTA HSRP Solutions Pvt Ltd या संस्थेची उत्पादकाची निवड करण्यात आली आहे अशी माहिती श्री. गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.



