Type Here to Get Search Results !

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत

सोमेश्वर विद्यालयात नवागतांचे स्वागत
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात पाचवीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. 
     ढोल ताशांच्या गजरात विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून मुख्य इमारती पर्यंत स्वागतफेरी काढण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ भोंडवे, शिक्षण संस्थेचे सचिव भारत खोमणे, आंबी बुद्रुकच्या सरपंच शीतल जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लालभाई शेख, सामाजिक कार्यकर्ते विजय कुतवळ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिक्षिका नूतन काळाणे यांनी विद्यालयात चाललेल्या उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष जेधे यांनी केले तर आभार हेमंत गडकरी यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test