सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे देऊळवाडी येथील सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट सचिव पदी सचिन सतीश भांडवलकर यांची नुकतीच निवड गुरुवार दि २५ रोजी देवस्थान ट्रस्ट ऑफिसमध्ये झाली.अगोदरचे सचिव विपुल विलास भांडवलकर यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने व सचिव पदासाठी सचिन सतीश भांडवलकर यांचा एकमेव अर्ज असल्याने ही निवड झाली अध्यक्षस्थानी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंत मोकाशी होते .
याप्रसंगी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अनंतराव वामनराव मोकाशी विद्यमान विश्वस्त विपुल विलास भांडवलकर ,मोहन मुरलीधर भांडवलकर , प्रताप मारुती भांडवलकर,अक्षय बाळासाहेब भांडवलकर ,प्रदीप बबन भांडवलकर राजेंद्र अरुणराव भांडवलकर ,संतोष पंढरीनाथ भांडवलकर ,सुनील बबन भांडवलकर ,रामदास बबन भांडवलकर आदी मान्यवर उपस्थित होते.



