Type Here to Get Search Results !

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य संकलन उपक्रमास प्रारंभ

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य संकलन उपक्रमास प्रारंभ
सोमेश्वरनगर - महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते तथा सर्वांचे श्रद्धास्थान स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज, सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता, श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य संकलन उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. हा उपक्रम 22 जुलै 2026 पर्यंत चालणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शालेय साहित्याचे योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संग्रामभाऊ सोरटे, संचालक लक्ष्मण गोपणे व माजी संचालक रूपचंद (बापू) शेंडकर, उद्योजक संतोष कोंढाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब शिंदे, करंजेचे सरपंच भाऊसाहेब हुंबरे व वैभव गायकवाड, सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन आनंद मोकाशी, सचिव सचिन भांडवलकर, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रतापराव गायकवाड, तसेच प्रवीण सूर्यवंशी, शिवाजीराव शेंडकर, मोहन भांडवलकर, सुनील केंजळे नाना शिरसागर तानाजी भापकर, रामभाऊ शेलार विष्णुपंत दगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित राहून उपक्रमाला पाठिंबा दिलेल्या सर्व मान्यवरांचे आभार श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेव शिंदे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test