Type Here to Get Search Results !

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगेराष्ट्रीय घाटाचा राजा ठरला कर्नाटकचा श्रीनिवास राजपूत‘गदिमा’त पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा मानकरी ठरला मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगे.
राष्ट्रीय घाटाचा राजा ठरला कर्नाटकचा श्रीनिवास राजपूत

‘गदिमा’त पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीया नवी दिल्ली आणि सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी देशभरातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ४२५ स्पर्धक सहभागी झाले होते. महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते या स्पर्धेचा बक्षीस वितरण गदिमा सभागृह येथे संपन्न झाला. 

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्ष सचिन सातव, माळेगाव नगरपंचायतचे अध्यक्ष सुयोग सातपुते, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, असे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन करुन श्री.बनसोडे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचाराचा वारसा अविरत सुरु ठेवण्यासाठी दिवंगत अजित पवार यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. राज्याच्या प्रगतीमध्ये समाजातील शेवट्या घटकांला न्याय देण्याची भूमिका होती. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयात वंचित, शोषित आणि कष्टकऱ्यांच्या प्रती आस्था स्पष्ट दिसून येते. त्यांची शब्दाचा पक्का माणूस, समाजाच्या प्रगतीकरिता पहाटेपासून ते रात्रीपर्यंत काम करणारा नेता, संकटांच्या काळात पाठीमागे भक्कम उभे राहून साथ देणारा म्हणून सर्वत्र ओळख होती, असेही श्री. बनसोडे म्हणाले. 

ॲड. कदम प्रास्ताविकात म्हणाले, अजित पवार यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या या सायकल स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. या स्पर्धा चार गटात घेण्यात आल्या. देशभरातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ४२५ स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेचे सूक्ष्म पातळीवर नियोजन करण्यात आले. स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी सायकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी सांभाळल्या. ही स्पर्धा अनेक युवकांना प्रेरणादायी ठरत आहे.

*स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे (कंसात कि.मी. व वेळ):*

घाटाचा राजा (दिवे घाट) - राष्ट्रीय स्पर्धा- कर्नाटकचा श्रीनिवास राजपूत (८. मी. ३२ सेकंद )
घाटाचा राजा (दिवे घाट) - राज्य स्पर्धा - महाराष्ट्राचा निहाल नदाफ ( ८ मी. ४० सेकंद )

१) पुणे ते बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीय स्तर (१२२ कि.मी.)
 प्रथम क्रमांक - मणिपूरचा अथोकपाम बाईक सिंगे (२.२९.००), द्वितीय क्रमांक - तामिळनाडूचा जोएल सुंदराम (२.२९.३७), तृतीय क्रमांक - गुजरातचा ध्रुव दिया (२.३०.३०).

२) पुणे ते बारामती पुरुषांसाठी राज्यस्तर - (१२२ कि.मी.)
प्रथम क्रमांक - महाराष्ट्राचा अमन तांबोळी (२.३७.३३), द्वितीय क्रमांक -महाराष्ट्राचा हनुमान चोपडे (२.३८.२७), तृतीय क्रमांक - महाराष्ट्राचा रेहान शेख (२.३९.४८).

३) सासवड ते बारामती MTB सायकल खुली स्पर्धा पुरुषांसाठी राज्यस्तर (८५ कि.मी.)
 प्रथम क्रमांक - महाराष्ट्राचा ओंकार खेडकर (२.४१.०९), द्वितीय क्रमांक - महाराष्ट्राचा स्वराज कराळे (२.४१.१२), तृतीय क्रमांक -महाराष्ट्राचा वेदांत टिळेकर (२.४१.१५).

४) माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीयस्तर (१५ कि.मी.)
प्रथम क्रमांक - कर्नाटकच्या गंगा दांडीन ( २२. ११. ०८२ मिनिटात), द्वितीय क्रमांक- महाराष्ट्राच्या योगेश्वरी कदम(२२.१२.८१५ मिनिटात ), तृतीय क्रमांक -महाराष्ट्राच्या राजनंदिनी सोमवंशी (२२.१२.९२० मिनिटात).

५) सासवड - बारामती सायक्लोथॉन (८५ कि. मी.)
प्रथम क्रमांक - महाराष्ट्राचा अनुप पवार (२.१५.५४), द्वितीय क्रमांक- महाराष्ट्राचा अक्रम देवकाते (२.१६.०४), तृतीय क्रमांक - महाराष्ट्राचा खदुस शेख (२.१८.२७). 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माळसकांत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी योगासनांचे सादरीकरण केले.

सायकल असोसिएशनचे सचिव संजय साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेस विद्या प्रतिष्ठान बारामती व एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थांचे सहकार्य लाभले.

सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड व प्रा. संध्याराणी आटोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test